वास्तुशास्त्रानुसार 'ही' आहे गणरायाच्या स्थापनेची योग्य दिशा...

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो.

Image Source: pinterest

यावर्षी गणेश चतुर्थीचा उत्सव 27 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे.

Image Source: pinterest

या दिवशी गणपतीची स्थापना करुन विधीवत पूजा केली जाते. असं म्हणतात यामुळे सौभाग्यात चांगली वृद्धी होते.

Image Source: pinterest

हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्ष चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 54 मिनिटांनी सुरु होणार आहे ते 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 3 वाजून 44 मिनिटांनी ही पूजा संपन्न होणार आहे.

Image Source: pinterest

प्रदोष काळात होणाऱ्या पूजेला सोडून सर्व व्रत उत्सवाच्या दिवशी उदय तिथीनुसार केले जातात.

Image Source: pinterest

भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर, घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.

Image Source: pinterest

वास्तूशास्त्रानुसार, गणपतीची मूर्ती घराच्या उत्तर-पूर्व दिशेला स्थापित करावी आणि जर जागा उपलब्ध नसेल तर पूर्व, पश्चिम किंवा उत्तर दिशेला स्थापित करू शकता.

Image Source: pinterest

गणपतीची मूर्ती घरी आणताना मूर्तीबरोबर गणपतीच्या हातात मोदक आणि वाहन उंदीरमामा असावा.

Image Source: pinterest

गणपतीची बैठ्या स्थितीतली मूर्ती घरी आणणं सर्वात शुभ मानलं जातं. अशी मूर्ती आणल्याने सौभाग्य, सुख-शांती आणि यश मिळतं.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest