लाडक्या बाप्पाचा 'हा' आहे आवडता अंक...

Published by: जगदीश ढोले
Image Source: pinterest

अंकशास्त्रानुसार अंक 5 च्या लोकांवर गणपतीचा विशेष आशीर्वाद असतो. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल मूलांकांद्वारे जाणून घेऊ शकता.

Image Source: pinterest

जर तुमची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 असेल तर तुमची अंक संख्या 5 असते. या मूलांकाचा स्वामी बुध आहे आणि याच बुध ग्रहाचा कारक देवता गणपती बाप्पा आहे.

Image Source: google

त्यामुळे 5 अंक म्हणजेच मूलांक बाप्पाला प्रिय आहे. यंदा 27 ऑगस्ट 2025 रोजी गणेश चतुर्थी आहे.

Image Source: pinterest

या काळात देखील अंक 5 च्या लोकांवर बाप्पाची विशेष कृपा राहील. या दिवशी बाप्पाची पूजा करणं लाभदायक ठरेल.

Image Source: pinterest

पुराणानुसार, श्रीगणेशाची आराधना केल्याने शत्रू आणि ग्रहांच्या अशुभ दृष्टीपासून रक्षण होते, म्हणूनच गणेशाला संकट दूर करणारा म्हटलं जातं.

Image Source: pinterest

श्रीगणेशाची आराधना केल्याने कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे माणसाला धन, बुद्धी आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते.

Image Source: pinterest

गणेश चतुर्थीच्या दिवशी अंक 5 च्या लोकांनी काही उपाय केले पाहिजेत. या विशेष उपायांमुळे बाप्पाची कृपा प्राप्त होते आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते.

Image Source: pinterest

गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि बाप्पाला हिरव्या वस्तू दान करा.

Image Source: google

मुलांना वाचन आणि लेखन साहित्य भेट द्या आणि गाईला हिरवा चारा द्या.

Image Source: pinterest

रुग्णालयांना आवश्यक औषधं दान करा आणि नपुंसकांना देणगी द्या.

Image Source: pinterest

गणेश चतुर्थीच्या दिवशी अंक 5 असलेल्या लोकांनी 'ॐ गं गणपतये नमो नमः' या मंत्राचा 108 वेळा जप करावा.

Image Source: pinterest

बाप्पाचा हा शक्तिशाली मंत्र जीवनात आनंद आणतो, संपत्ती आणि धनधान्य प्राप्त करून देतो आणि नोकरी, व्यवसाय आणि करिअरमधील सर्व अडथळे दूर करतो.

Image Source: pinterest

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pinterest