अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा 'मोरेश्र्वर'. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी थेऊरचा चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून 30 कि.मी. अंतरावर आहे.
सिद्धटेकचा सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून 19 कि.मी. अंतरावर आहे.
अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे.
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा गिरिजात्मज. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून 7 कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे 97 कि. मी. अंतरावर आहे.
महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. रायगड जिल्ह्यातील महाड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. पाली खोपोलीपासून 38 कि.मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून 111 कि.मी. अंतरावर आहे.