आज घेतलेले आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील त्यामुळे योग्य ठिकाणी गुंतवणूक करा.
वडीलधाऱ्या मंडळींना तुमचे विचार पटणार नाहीत थोडे खटके उडण्याची शक्यता. महिलांनी व्यापक विचार करणे गरजेचे ठरेल.
चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याकडे कल राहील. काही सुखद घटना घडतील.
भाग्याची साथ मिळाल्यामुळे नवीन गोष्टी करण्याची संधी आजची जाऊ देऊ नका. भरपूर प्रयत्न करा.
आज तुमच्या मनासारखी कामे होतील परंतु तेवढेच भरपूर कष्टही करावे लागतील.
आज तुमच्या बोलण्यावर बरच काही अवलंबून राहील. सडेतोड उत्तरांमुळे इतरांच्या टीकेला पात्र ठराल.
तर चला मर्यादा झाल्यामुळे जवळची पुंजी संपून जाईल. खर्चावर बंधन घालायला हवे.
वैवाहिक जीवनात थोडे ताण-तणाव सहन करावे लागतील. प्रसिद्धीचे अनेक संधी उपलब्ध होतील.
कष्टदायक दिवस. व्यवसाय धंद्यात योग्य व्यक्तींशी संपर्क ठेवण्यात यशस्वी व्हाल.
अडलेल्या कामांना गती मिळेल. प्रकृती टिकवण्यासाठी मूळ विचारात बदल करावा लागेल.
मनातील ताण दर्पणाचे प्रतिसाद शरीरावर उमटल्या वाचून राहणार नाही. परंतु जे पेरलेले असेल ते नक्की उगवणार आहे.
आज ईश्वर चिंतन करायला विसरू नका म्हणजे सर्व गोष्टी सुसह्य होतील. महिला मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतील.