दिवाळीमध्ये लक्ष्मीची पूजा करून आपल्यावर तिचा कृपा-आशीर्वाद राहावा, यासाठी मनोकामना केली जाते.
घर असो किंवा कार्यालय असो; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला प्रत्येक ठिकाणी मोठे महत्त्व आहे.
यंदा शुक्रवारी, १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजन केले जाणार आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी विशिष्ट मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीपूजनाची योग्य पद्धत व पूजनाचे काही नियम जाणून घेऊया...
लक्ष्मीपूजनावेळी पाळावयाचे काही नियम
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराचे सर्व दरवाजे, खिडक्या, दिवे किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत सुरू ठेवावेत. श्रीसुक्त किंवा महालक्ष्मी अष्टक तसेच लक्ष्मी देवीच्या अन्य स्तोत्रांचे पठण करावे.
लक्ष्मी पूजन सुरू असताना कोणासोबतही आर्थिक व्यवहार करू नये.
या रात्री अखंड ज्योत तेवत ठेवावी. लक्ष्मी देवीला शिंगाडा, बत्ताशे, लाह्या, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय असून, यापैकी कोणत्याही पदार्थाचा नैवेद्य दाखवावा
( वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )