शास्त्रानुसार, डोळ्यांच्या फडफडण्यामागे शुभ किंवा अशुभ कारणं असतात. वास्तुशास्त्रानुसार पुरुषांसाठी उजव्या डोळ्याचं फडफडणं शुभ मानलं जातं. उजवा डोळा फडफडणं पुरुषांसाठी चांगलं असतं. अशा वेळी तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो, एखाद्या कामात यश मिळू शकतं किंवा चांगल्या मित्राला भेटण्याची संधी मिळू शकते. पुरुषांचा डावा डोळा फडफडणं अशुभ समजलं जातं. यामुळे वाद, कामात अडथळे, कुटुंबात कलह, अतिरिक्त खर्च होण्याची शक्यता असते. स्त्रियांसाठी डाव्या डोळ्याचं फडफडणं शुभ असतं. जर एखादा स्त्रीचा डावा डोळा फडफडत असेल तर तिला चांगली बातमी मिळू शकते. याउलट, उजवा डोळा फडफडणं हे स्त्रियांसाठी अशुभ मानलं जातं, या वेळी संकटाची चाहूल मिळत असते. (टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )