आचार्य चाणक्य यांच्या मते सर्वात आधी मूर्ख लोकांना अजिबात सल्ला द्यायला जाऊ नका.
कारण या लोकांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करताय हे कळत नाही यासाठी ते आयुष्यात त्याचा वापरही करता येत नाही.
आचार्य चाणक्य यांच्या मते लालची लोकांना विनाकारण सल्ले देऊ नका.
मुळात त्यांना सल्ला दिल्याने तुमचे प्रयत्न व्यर्थ जातील.
ज्या लोकांच्या रक्तातच समोरच्या व्यक्तीला दु:ख देणं, वाईट चिंतणे असतं अशा लोकांना चुकूनही सल्ले देऊ नका.
कारण जर कोणी यांना सल्ला दिला तर त्याचा स्वार्थासाठी वापर करतात.
आचार्य चाणक्य यांच्या मतानुसार, अहंकारी लोकांना कधीच सल्ला देऊ नका.
कारण अशा लोकांना फक्त आणि फक्त आपलं म्हणणं ऐकायला आणि ते सिद्ध करुन दाखवायला आवडतं.