आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील एक महान आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते.
ते भारतीय राजकारण आणि नैतिकतेसाठी ओळखले जातात.
आचार्य चाणक्य यांनी आपल्या अनुभवातून अर्थशास्त्र, कुटनीती, चाणक्य नीती ही रचना केली होती.
चाणक्य यांनी लहान मुलांना जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले.
तर, हे मार्ग किंवा या सवयी नेमक्या कोणत्या आहेत त्या जाणून घेऊयात.
चाणक्य नीतिनुसार, लहान मूल, विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय, लक्ष्य नेमकं काय आहे याबाबत त्यांना कधीच विसर पडता कामा नये.
लहान मुलांनी आपलं जीवन शिस्तीत जगणं गरजेचं आहे. चाणक्य नीतीनुसार प्रत्येक गोष्टीची एक निश्चित वेळ असावी
चाणक्य नीतीनुसार मुलांनी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. हा काळ वाचनासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो.
कोणत्या वेळी काय करावे हे मुलांनी वेळीच शिकणं फार महत्वाचं आहे, तरच यश फार लवकर आणि सहज मिळवता येते.
विद्यार्थ्यांनी नेहमी पौष्टिक आणि संतुलित आहार घ्यावा.यामुळे शरीर निरोगी आणि सुदृढ राहतं.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)