चाणक्य नीतीमध्ये जीवनाच्या विविध पैलूंवरील धोरणे आणि शिकवण दिलेली आहेत.
जी व्यक्ती आयुष्यात यश मिळवते त्यांना अनेक शत्रू असतात.शत्रूचा कसा सामना करावा हे माहित असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला तुमच्या शत्रूंचा सामना करायचा असेल तर त्यासाठी सर्वात आधी तुमचा शत्रू नेमका कोण हे जाणून घ्या.
शत्रूसमोर तुमची कमजोरी कधीही दाखवू नका.त्याच्यासमोर तुमची ताकद दाखवा त्यामुळे शत्रू तुम्हाला घाबरत राहील.
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी प्रथम रणनीती बनवणे आवश्यक आहे. तुमची रणनीती नेहमी गुप्त ठेवा.
शत्रूवर विजय मिळवण्यासाठी संयम आवश्यक आहे. घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका.
तुमच्या शत्रूची कमकुवतता शोधा आणि ती तुमच्या रणनीतीमध्ये वापरा.
तुमच्या शत्रूकडेही तुमच्याबद्दल अनेक प्रकारची माहिती असेल हे लक्षात ठेवा. त्यामुळे शत्रूला कधीही कमजोर समजू नका.
मोठ्या ध्येयासाठी खूप तयारी करावी लागेल. यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)