आठवड्यातील काही दिवस असे आहेत ज्यामध्ये नखं कापणं अशुभ मानलं जातं.
या दिवसांत नखं कापल्याने आयुष्यात तंगी, कष्ट आणि समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
शनिवारी नखं कापल्याने शनी नाराज होतो, तर, रविवारच्या दिवशी नखं कापल्याने कुंडलीतील सूर्य ग्रह कमजोर होतो.
गुरुवार हा दिवस भगवान विष्णूला समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी नखं कापू नका.
शास्त्रानुसार, नखं कापण्यासाठी बुधवार आणि शुक्रवारचा दिवस शुभ मानला जातो.
शुक्रवारच्या दिवशी नखं कापल्याने सौंदर्य आणि आकर्षणात वाढ होते.
जर तुम्हाला नखं कापायची असतील तर त्यासाठी चुकूनही सूर्यास्ताची वेळ निवडू नका.
संध्याकाळी किंवा रात्री नखं कापल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.
नखं कापण्यासाठी योग्य वेळ सूर्योदयाची आहे.