भारतात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
जन्माष्टमीचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात.
यंदा जन्माष्टमी 26 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे.
श्रावण कृष्ण पक्षातील अष्टमीला जन्माष्टमी आणि दुसर्या दिवशी दहीहंडी अशा पद्धतीने हा सण साजरा होतो.
यादरम्यान, अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर श्रीकृष्णाची कृपा राहणार आहे.
या राशी कोणत्या आहेत जाणून घेऊयात.
वृषभ राशी श्रीकृष्णाची आवडती रास मानली जाते. श्रीकृष्णाच्या कृपेने या राशीच्या लोकांना प्रत्येक कामात यश मिळते.
कर्क राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची मनापासून पूजा केल्याने त्यांना जीवनात कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही.
या राशीचे लोक धाडसी असतात त्यामुळे श्रीकृष्णाला ही रास फार प्रिय आहे. सिंह राशीच्या लोकांनी कृष्णाची पूजा केल्याने त्यांना चांगले फळ मिळते आणि त्यांची रखडलेली कामेही पूर्ण होतात.
तूळ राशीच्या लोकांवर श्रीकृष्णाचा विशेष आशीर्वाद राहतो तूळ राशीच्या लोकांनी श्रीकृष्णाची नियमितपणे पूजा केल्याने श्रीकृष्ण प्रसन्न होतात आणि घरात सुख-समृद्धी नांदते.