वास्तुशास्त्रानुसार, घरामध्ये काही विशिष्ट रोप लावल्याने आर्थिक अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-शांती नांदते.
वास्तुशास्त्रानुसार, कोरफडाचे रोपं लवल्यास ते खूप शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार, जर घरात कोरफडीचे रोप असेल तर प्रेम, प्रगती, संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढते.
आर्थिक समस्या दूर होतील.तुमच्या उत्तपन्नात वाढ होताना दिसून येईल.
जर घरात कोरफडाचं रोपं लावलेले असेल तर सकारात्मक ऊर्जा संचारेल आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो.
मात्र, जर तुम्ही घरी कोरफडीची लागवड करत असाल तर तुम्ही दिशा लक्षात ठेवणं जरूरी आहे.
वास्तुशास्त्रानुसार, कोरफडाचे रोप घराच्या पूर्व दिशेला लावता येते.असे केल्याने घरात शांतता नांदेल आणि मनंही प्रसन्न राहतं.
कोरफडाचे रोप पश्चिम दिशेला ठेवल्यास चांगले मानले जाते.हे रोप उत्तर-पश्चिम दिशेला कधीही ठेवू नये.
चुकीच्या दिशेला रोप ठेवणे टाळा. त्यामुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असू शकते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)