पती-पत्नीच्या वैवाहिक जीवन सुखकर होण्यासाठी चाणक्याने काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. दोन जीवांची रेशीमगाठ ब्रम्हदेव स्वर्गात बनवतात, पण वैवाहिक जीवन सुखी ठेवण्याची जबाबदारी मानवाची आहे. सुखी वैवाहिक जीवनाचे हे सूत्र आहे की, पती-पत्नी एकमेकांचा आधार आहेत. चाणक्य सांगतात की ज्याप्रमाणे पत्नीचे रक्षण करणे हे पतीचे कर्तव्य आहे. त्याचप्रमाणे पती कुठल्या संकटात असेल, तर त्याची काळजी करणे ही पत्नीची जबाबदारी आहे. पती नाराज किंवा दुःखी असल्यास प्रेमातून काळजी घेणे किंवा त्याला आनंदी ठेवणे हे पत्नीचे कर्तव्य आहे. चाणक्यनीतीनुसार, पती-पत्नीने एकमेकांवरील प्रेम, त्याग आणि समर्पणाची कधीही लाज बाळगू नये. वैवाहिक जीवनाची गाडी तेव्हाच पुढे सरकते जेव्हा तिच्यावर विश्वास असतो. चाणक्यनीतीमध्ये सांगितले की, पत्नी तिच्या काही गोष्टी पतीपासून लपवते. जसे की गंभीर आजार, कौटुंबिक मतभेद इत्यादी. यामागे महिलांचा उद्देश असतो की तिला आपल्या पतीला त्रास द्यायचा नाही. चाणक्यांनी सांगितले आहे की, एखाद्या महिलेचे बाह्य सौंदर्य पाहून जीवनसाथी निवडू नये. नेहमी त्याच्या गुणांवरून निवड करा. (टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)