हिंदू धर्मात गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

गणपती विसर्जन गणेश चतुर्थीच्या दहाव्या दिवशी म्हणजेच अनंत चतुर्दशीला केले जाते.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

अशा स्थितीत त्यांना आनंदाने निरोप दिला पाहिजे.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त ;

17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे, या दिवशी गणपती विसर्जनासाठी अनेक शुभ मुहूर्त आहेत.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

वैदिक पंचांगानुसार, पहिला मुहूर्त सकाळी 9:10 ते दुपारी 1:47 पर्यंत असेल

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

दुसरा मुहूर्त दुपारी 3:18 ते संध्याकाळी 5:50 पर्यंत असेल.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

तिसरा मुहूर्त संध्याकाळी 7:51 ते रात्री 9:19 पर्यंत असेल.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

चौथा शुभ मुहूर्त रात्री 10:47 ते दुसऱ्या दिवशी 18 सप्टेंबर रोजी 03:12 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तांमध्ये तुम्ही विधींनुसार गणपतीला निरोप देऊ शकता.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

गणेश विसर्जनाची पूजा पद्धत

बाप्पाच्या विसर्जनासाठी आधी पाट तयार करून त्यावर स्वस्तिक चिन्ह बनवून गंगाजल शिंपडावं.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

यानंतर गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून, नवीन पिवळे वस्त्र परिधान करून कुंकू तिलक लावावं.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

पूजेदरम्यान श्रीगणेशाला लाल चंदन, लाल फुले, दुर्वा, मोदक, सुपारी, सुपारी, धूप-दीप इत्यादी अर्पण करा.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

त्यानंतर आपण आपल्या कुटुंबासह श्रीगणेशाची आरती करावी आणि झालेल्या चुकीबद्दल क्षमा मागून मूर्तीचे विसर्जन करावं.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

अशा प्रकारे, आपण गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन करू शकता आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणत त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी प्रार्थना करू शकता.

Image Source: Pexel/Google/Unplash / Pintrest

टीप :

( वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: ABP