आज तुम्हाला अॅसिडीटी त्रास होऊ शकतो. वातावरणातील बदलामुळे पोट देखील बिघडू शकतं. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला जास्त उन्हाचा त्रास सहन करावा लागू शकतो. काही कारणास्तव तुम्हाला आज बाहेरचं काम करावं लागेल. अशा वेळी आरोग्याची योग्य काळजी घ्या.
ज्यांना फीट्स येण्याचा त्रास आहे त्यांनी जास्त काळजी घ्यावी. हा त्रास पुन्हा येण्याची शक्यता आहे.
आज तुमचे आरोग्य चांगले असेल. फक्त अॅसिडीटीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे बाहेरचं खाणं टाळा.
आज तुम्हाला लो बीपीच्या कारणाने अशक्तपणा जाणवू शकतो. जास्त कामाचा ताण घेऊ नका.
तुमचे आरोग्य चांगले राहील. कोणत्याच प्रकारचा ताण स्वत:वर ओढून घेऊ नका.
मानसिक आजारी रुग्णांनी डॉक्टरांच्या संपर्कात राहून त्यांनी दिलेल्या सर्व सूचनांचं काटेकोरपणे पालन करावं.
किरकोळ आजार देखील गांभीर्याने घ्या आणि त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा. निष्काळजीपणामुळे हा आजार मोठा व्हायला वेळ लागणार नाही.
आरोग्याच्या दृष्टीकोनातून दिवस सामान्य आहे. तुम्हाला सध्याच्या आजारांपासून लवकरच आराम मिळेल.
तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यात कोणताही हलगर्जीपणा करू नका. अन्यथा दिर्घकालीन आजार पुन्हा उद्भवू शकतो.
महिला चेहऱ्याशी संबंधित समस्याने त्रस्त असू शकतात. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.
आज कोणतीही जड वस्तू उचलताना काळजी घ्या. वातावरणातील बदलाचा तुमच्या आरोग्यावर परिणा होऊ शकतो.
(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)