आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे.
दर आठवड्याला मुंबई एनसीबी कार्यालयात हजेरी लावण्याची अट शिथील करण्यात आली आहे.
जर एनसीबीला आर्यनची चौकशी करायची असल्यास तपासयंत्रणेनं तशी नोटीस जारी करावी.
दिल्लीतील कार्यालयात हजेरीसाठी किमान 72 तास आधी एनसीबीच्या एसआयटीनं आर्यनला नोटीस द्यावी,
असे निर्देश न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांनी बुधवारी जारी केले.
कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्स प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खाननं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा याचिका दाखल केली आहे.
या प्रकरणी हायकोर्टानं जामीनासाठी घातलेल्या काही अटींशर्तींमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी आर्यनकडून या अर्जाद्वारे करण्यात आली होता.
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कोर्डिलिया आलिशान क्रूझवर 2 ऑक्टोबर रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले.
त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा आणि अन्य 20 जणांना अटक करण्यात आली.