गेली काही वर्षे नासाचे वैज्ञानिक आर्टेमिस 1 मिशनमध्ये गुंतले होते, अखेर ते प्रक्षेपित होणार आहे.



सोमवारी केप कॅनवेरल लॉन्च कॉम्प्लेक्स येथून ओरियन अंतराळयान प्रक्षेपित केले जाईल. या अभियानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे



मानवाला चंद्रावर पाठवण्यापूर्वी नासाचे हे प्रथम चाचणी उड्डाण असेल, ज्यामध्ये एकही अंतराळवीर जाणार नाही.



50 वर्षांनंतर नासा मानवाला चंद्रावर पाठवण्याच्या तयारीत आहे.



नासा आर्टेमिस 1 मोहिमेअंतर्गत हे पहिले चाचणी उड्डाण अवकाशात पाठवत आहे. हे रॉकेट आज फ्लोरिडा लाँचपॅडवरून लॉंच होईल.



आर्टेमिस 1 अंतर्गत, मिशन ओरियन अंतराळ यानाकडे पाठवले जाईल, ज्यामध्ये 6 लोकांसाठी बसण्यासाठी डीप-स्पेस एक्सप्लोरशन कॅप्सूल आहे.



यात 2,600 टन वजनाचे 322 फूट लांब स्पेस लॉन्च सिस्टम (SLS) मेगारॉकेट असेल.



हे रॉकेट सोमवारी सकाळी 8.33 वाजता पहिल्या लिफ्टऑफसाठी सज्ज आहे. हे रॉकेट तब्बल 42 दिवस चंद्राभोवती फिरणार आहे



मिशनमध्ये कोणताही अंतराळवीर जाणार नाही,, तर मानवी पुतळे जातील



Photo tweeted by @NASA