ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान

पुरस्काराचे 25 लाख रुपयांचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची घोषणा

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी लाखो लोक उपस्थित होते.

राज्याच्या विविध भागातून लाखो लोक खारघरमध्ये दाखल

या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित

गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचं काम करणार : आप्पासाहेब धर्माधिकारी

महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना

प्रत्येकाने पाच पाच झाडे लावावी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं आवाहन

आप्पासाहेबांचं काम मोठं, त्यांना मिळालेला पुरस्कार ही लाखो लोकांना प्रेरणा : अमित शाह