‘बिग बॉस 14’ची विजेती ठरलेली प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलैक 30 जानेवारीला ‘बिग बॉस 15’च्या फिनालेमध्ये दिसणार आहे.



रुबिनाचा बॉसी लूक पुन्हा एकदा ‘बिग बॉस 15’मध्ये पाहायला मिळणार आहे.



शोमध्ये येण्यापूर्वी, अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ‘बॉसी’ लूकमध्ये दिसली आहे.



या फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाचा टॉप आणि ट्राउझर्स परिधान केले आहे, त्यासोबत अभिनेत्रीने काळ्या रंगाचा ब्लेझर देखील परिधान केला आहे.



अभिनेत्रीच्या आउटफिटवर गुलाबी रंगाचे एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आले आहे, जे काळ्या रंगावर चांगलेच उठून दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीने तिच्या केसांचा अंबाडा बांधला आहे, ज्यामुळे ती बॉसी दिसत आहे.



रुबिना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते.