'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे.
आता कार्यक्रमातील नुकत्याच पार पडलेल्या भागात अभिनेत्री अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतबद्दल भाष्य केलं
अंकिता लोखंडेने 'बिग बॉस 17'च्या घरात सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मौन सोडलं आहे.
'बिग बॉस 17'च्या मागच्या आठवड्यात विकी जैन आणि ऐश्वर्या शर्माचं जोरदार भांडण झालं होतं.
त्यावेळी सुशांत सिंह राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दल अंकिताने भाष्य केलं.
ब्रेकअपबद्दल बोलताना अंकिता म्हणाली,सुशांत आणि माझ्या ब्रेकअपचं विशेष असं कारण नाही. सुशांतने मला ब्रेकअपचं कारण सांगितलेलं नव्हतं.
त्यावेळी त्याचं करिअर खूपच चांगलं सुरू होतं. दरम्यान अनेकांना त्याचे कान भरले. पण अखेर निर्णय त्याचा होता. मी कोणत्या गोष्टीसाठी त्याला थांबवलं नाही.
अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत यांनी 'पवित्र रिश्ता' या मालिकेत एकत्र काम केलं. या मालिकेच्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं.
७ वर्षाच्या रिलेशनंतर 2016 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला, त्यानंतर अंकिता विकी जैनला डेट करू लागली. 2021 मध्ये ती विकीसोबत लग्नबंधनात अडकली.