बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडेच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. अनन्या ही सध्या लायगर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अनन्याचा 'लायगर' हा चित्रपट 25 ऑगस्टला सिनेमागृहात रिलीज होणार आहे. अनन्यासोबतच अभिनेता विजय देवरकोंडानं देखील लायगरमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. स्टूडंट ऑफ द इयर-2 या चित्रपटामधून अनन्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. अनन्याच्या स्टाईलला आणि हटके लूक्सला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. अनन्याला सोशल मीडियावर काही जण ट्रोल करतात. तर काही तिचं कौतुक देखील करतात. अनन्याच्या आगामी चित्रपटाची वाट तिचे चाहते उत्सुकतेनं बघतात. अनन्या तिच्या लायगर चित्रपटामध्ये सध्या व्यस्त आहे. गेहराईंया, खाली पिली, पती पत्नी और वो या चित्रपटातील अनन्याच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.