अभिनेत्री अनन्या पांडेने नुकतेच तिचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



अनन्या सध्या तिच्या आगामी ‘लायगर’ या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे.



या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.



अभिनेत्री अनन्या पांडे नेहमीच लाइमलाइटचा भाग असते.



सध्या विजय आणि अनन्या त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये प्रचंड व्यस्त आहेत.



दरम्यान अभिनेत्री स्वतःचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहे.



नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिने क्रिम-गोल्डन रंगाचा लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे.



अभिनेत्रीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती लवकरच साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडासोबत पॅन इंडिया चित्रपट 'लायगर'मध्ये दिसणार आहे.



याशिवाय अभिनेत्री 'खो गये हम कहाँ'मध्येही दिसणार आहे.