'हर हर महादेव' सिनेमातील अमृता खानविलकरचा लुक समोर आला आहे. अमृता खानविलकर 'हर हर महादेव' या सिनेमात सोनाबाई देशपांडे यांच्या भूमिकेत दिसणार आहे. 'हर हर महादेव' हा अमृताचा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे. अमृता पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत दिसून येणार आहे. अमृताचा 'हर हर महादेव' हा सिनेमा 25 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमृताचा 'हर हर महादेव' हा सिनेमा पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अमृता खानविलकर नेहमीच वेगवेगळ्या लुकमधले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अमृताचा 'चंद्रमुखी' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अमृताचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. अमृताचा 'चंद्रमुखी' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.