बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खानचा एक वेगळा चाहतावर्ग आहे. ती तिच्या स्टायलिश लूकसाठी ओळखली जाते. गौरी तिच्या फॅशन सेन्समुळे अनेकदा चर्चेत असते. आज गौरी कोट्यवधींची मालकीन आहे. किंग खानच्या यशात गौरीचा मोठा वाटा आहे. शाहरुख खान आणि गौरी खानकडे 7304 कोटी संपत्ती आहे. गौरी 1600 कोटींच्या संपत्तीची मालकीन आहे. गौरीचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे प्रोडक्शन हाऊस मानले जाते. किंगखानचा मन्नत 200 कोटींचा असल्याचे म्हटले जाते. गौरीचं स्वतःचं लक्झरी दुकानदेखील आहे.