काकडी फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

कारण हिवाळ्यात आपण पाणी कमी पितो आणि घामही कमी येतो. अशा परिस्थितीत हिवाळ्यात काकडी खाल्ल्यास शरीरात पाण्याची कमतरता भासू देत नाही.

काकडीत बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन सी सारखे अँटी-ऑक्सिडेंट असतात, जे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.

काकडी तुमच्या वाढत्या वजनावर नियंत्रण ठेवू शकते. काकडीत 90 टक्के पाणी असते.

जर तुम्हाला हिवाळ्यातही काकडी खाण्याची सवय असेल तर ती तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

पोटात उष्णता असेल किंवा आम्लपित्त वाढले असेल तरीही काकडी खाल्ल्याने खूप आराम मिळतो.

काही लोक डोळ्यांना काकडी देखील लावतात, त्यामुळेच काकडी डोळ्यांना आराम मिळतो.

एका काकडीत 15-17 कॅलरीज असतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.