बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बहुप्रतिक्षित 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये बिग बी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेंनी केले आहे. 'झुंड' सिनेमा 4 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'झुंड' हा क्रिडाविषयक सिनेमा आहे. अमिताभ बच्चन यांच्या 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 'झुंड' सिनेमा फुटबॉल प्रशिक्षकाच्या आयुष्यावर भाष्य करणारा आहे.