आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने अमित वानखेडे यांनी मराठा आंदोलनाचं मुंबईत आझाद मैदानावरील चित्र उभं केलं आहे



'२० जानेवारीला मुंबईत मराठा समाज आल्यानंतर..' या कल्पनेवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने ही चित्रं तयार केली आहेत



मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करण्याची भूमिका मनोज जरांगे यांनी जाहीर केली आहे.



त्यासाठी 20 जानेवारीला आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे मराठे निघतील असेही जरांगे म्हणाले आहेत.



त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात कधी उपोषण सुरु होणार आणि आंतरवाली सराटी ते मुंबई प्रवास कसा असणार,याबाबतचा संपूर्ण प्लॅन मनोज जरांगे यांनी सांगितला आहे.



20 जानेवारीला सकाळी नऊ वाजता जरांगे सोबत आंतरवाली सराटी गावातून मुंबईकडे निघणार आहोत.



आंतरवाली सराटी गावातून मराठे पायी प्रवास करत मुंबईत धडकणार.



मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतील.



अंदाजे 26 जानेवारीला प्रत्यक्षात मुंबईत उपोषणाला सुरुवात होऊ शकते.



या काळात 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात क्युरेटीव्ह याचिकेवर सुनावणी होणार आहे.