अहमदनगरला टाकळी ढोकेश्वर येथे दुर्घटना झाली. अहमदनगरला टाकळी ढोकेश्वर येथे नगर-कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात कार झाडाला धडकली. या अपघातात पोलिस शिपाई महेश तुकाराम काठमोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात आणखी दोघे जखमी झाले आहेत. काठमोरे हे नारायणगाव पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होते. पोलिस कॉन्स्टेबल महेश काठमोरे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर येथील रहिवासी होते. या कारमध्ये असणारा वाहन चालक साहील करीम हुसेन खान आणि गणेश सचिन शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेतील जखमींवर नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू.. या प्रकरणी कार चालक साहिल खान विरोधात पारनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.