केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) पुणे दौऱ्यावर (Pune) आहेत. अमित शाहांनी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन दर्शनाला सुरुवात केलीय.
णे महापालिकेकडून अमित शहांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी करण्यात आली.
पुणे महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन अमित शाह यांच्या हस्ते केलं जाणार आहे. दरम्यान, अमित शाह यांच्या हस्ते आज पुणे महापालिकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलंय.
तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचंही अमित शाह यांच्या हस्ते भूमिपुजन झालंय.
यावेळी अमित शाह यांनी बाबासाहेबांचं संघर्ष आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यावर भाष्य केलंय.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
काल (शनिवारी) ते अहमदनगरमध्ये होते. प्रवरानगर येथे राज्यस्तरीय सहकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.