अभिनेता अल्लू अर्जुनच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटासाठी तीन गाणी तयार झाली आहेत. अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा पुष्पा हा चित्रपट चांगलाच हिट ठरला आहे. अल्लू अर्जुनने या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता चाहते पुष्पाच्या दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पुष्पा द राइजच्या जबरदस्त यशानंतर संगीतकार देवी श्री प्रसाद यांनी बहुप्रतिक्षित सिक्वेलसाठी तीन गाणी तयार केली आहेत. निर्माते आता पुष्पाच्या दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू करण्यास तयार आहेत. आधी तयार केलेल्या गाण्यांमध् देवी यांनी किरकोळ बदल केले आहेत. बदलानंतर सिक्वेलसाठी तीन गाणी पूर्ण केली आहेत