मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.



'अप्सरा आली' म्हणत मराठी सिनेविश्वात बघता बघता लोकप्रिय झालेल्या सोनाली कुलकर्णीने (Sonali Kulkarni) मोठा चाहतावर्ग कमावला आहे.



नटरंग ते तमाशा लाइव्ह इथपर्यंतचा सोनालीचा प्रवास थक्क करणारा आहे.



कधी मराठमोळ्या तर कधी मॉडर्न लूकमधले फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधत असते.



सोनालीच्या स्टाइलही तिच्या चाहत्यांना भुरळ घालत असतात.



सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.



सोनालीचे चाहते तिच्या आगामी चित्रपटांची वाट बघत असतात. तिचा चाहता वर्ग मोठा आहे.



आज स्वातंत्र्यदिनानिमित्त सोनालीने एक खास लूक शेअर केला आहे.



हा लूक शेअर करत तिने सर्वाना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



तिने यात तिरंगाच्या रंगाची साडी नेसली आहे.