अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.
रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 17 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.
लग्नाबाबत आलिया आणि रणबीरनं अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
आता लग्नाच्या चर्चेवर आलियानं पहिली रिअॅक्शन दिली आहे.
प्रसिद्ध यूट्यूबर निकुंज लोटिया म्हणजेच बी. यूनिकनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यानं कबीर सिंह या चित्रपटातील एक सिन रिक्रिएट केला आहे.
व्हिडीओवर आलिया भटनं रिअॅक्शन दिली आहे. तिनं 'डेड' अशी कमेंट या व्हिडीओला केली आहे. त्यामुळे आता आलियानं लग्नाच्या चर्चेवर पुर्णविराम लावला आहे, असं नेटकरी म्हणत आहेत.