बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे.
'ब्रह्मास्त्र' चित्रपटाव्यतिरिक्त आलिया प्रेग्नेंट असल्यामुळेही चर्चेत आहे.
नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर तिच्या प्रेग्नेंसीबद्दल चाहत्यांना माहिती दिली. प्रेग्नेंसीनंतर आता तिचे नवे फोटोशूट चर्चेत आले आहे.
अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रेग्नेंसीनंतर आलियाचा हा ग्लॅमरस लूक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. नव्या फोटोशूटमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
या फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावरचे तेज पाहायला मिळत आहे. फोटोंमध्ये आलियाने वन-पीस ड्रेस परिधान केला आहे.
मोकळे केस तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोंमध्ये आलिया वेगवेगळ्या पोझमध्ये दिसत आहे.
यातील एका फोटोमध्ये तिच्या हातात आलियाची एंगेजमेंट रिंगही दिसत आहे. आलियाने या पोस्टला कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, 'या वर्षी मी अशीच कॉफी प्यायली.'