'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील परी अवघ्या काही आठवड्यात लोकप्रिय झाली आहे. केवळ सव्वाचार वर्षांच्या परीने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. सध्या परीचे मराठमोळ्या अंदाजातील फोटो व्हायरल होत आहेत. मायराचे स्वत:चे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. सोशल मीडियावरदेखील मायराचा चाहतावर्ग झपाट्याने वाढत आहे. मायरा मालिकेत समजुतदार, समजंस, थोडीशी मस्तीखोर, लबाड दाखवली आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेच्या सेटवर मायराचा सतत दंगा सुरू असतो. सेटवरील प्रत्येकासोबत मायरा आदराने आणि तितक्याच आत्मियतेने बोलत असते. मायराला सेटवर कधीच कंटाळा येत नाही. युट्यूबवर 'मायरास कॉर्नर' नावाचे मायराचे युट्युब चॅनल आहे.