'या' अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर केली करोडोंची कमाई!

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा (Alia Bhatt) चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ने (Gangubai Kathiawadi) बॉक्स ऑफिसवर कल्ला केला आहे.

तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकजण आलियाच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहे.

आलियाचे चाहते तिला राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र असल्याचे म्हणत आहेत.

निरागस दिसणार्‍या आलियासाठी अशी व्यक्तिरेखा साकारणे सोपे नव्हते, पण तिने ही भूमिका चोख बजावली. आलियाने खूप कमी वयात स्वतःला सिद्ध केले आहे. अलीकडेच आलिया भट्टने शाहरुख खानसोबत चित्रपट निर्मितीतही पाऊल ठेवले आहे.

या अभिनेत्रीने आपल्या मेहनतीच्या जोरावर करोडोंची कमाई केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आलिया भट्टची एकूण संपत्ती 165 कोटी रुपये आहे. आलियाचे वांद्रे येथे एक घर आहे, ज्याची किंमत जवळपास 32 कोटी आहे.

याशिवाय तिची स्वतःची व्हॅनिटी व्हॅन आहे. आलिया भट्टचेही लंडनच्या एका पॉश भागात घर आहे. आलिया भट्टला प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करायला आवडते, म्हणूनच ती स्वतःसाठी नवीन घरे खरेदी करत आहे. काही महिन्यांपूर्वी आलिया भट्टने जुहूमध्ये घर विकत घेतले होते.

आलियाकडे रेंज रोव्हर वोग आहे, ज्याची किंमत 1.74 कोटी रुपये आहे. एवढेच नाही, तर तिच्याकडे Audi A6 आहे ज्याची किंमत 61 लाख रुपये आहे आणि BMW 7 सीरीज देखील आहे, ज्याची किंमत सुमारे 1.37 कोटी असल्याचे सांगितले जात आहे