तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहोचलेले राणा-अंजली म्हणजेच हार्दिक जोशी
आणि अक्षया देवधर आज लग्नबंधनात अडकणार आहेत
दोघांचही केळवण, मेहंदी, हळद आणि संगीत दणक्यात पार पाडलं आहे.
अक्षया आणि तिच्या वडिलांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
. अक्षया सासरी जाणार असल्याने तिच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत.
अक्षयाने तिच्या नेलआर्टमध्ये तिच्या लग्नाची तारीख आणि त्या दोघांचे नावाचे पहिले अक्षर म्हणजेच 'अहा' असे लिहले आहे.
तिच्या नेलआर्टची ही हटके डिझाईन व्हायरल होत आहे.
तसेच तिची मेहंदीदेखील आकर्षक आहे. मेहंदीत तिने सप्तपदीची डिझाइन काढली आहे.
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडणार आहे.
. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारमंडळी त्यांच्या लग्नसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
नवरदेव असणाऱ्या राणादानेदेखील कोल्हापूरी पेहराव केला होता!