राणादा आणि पाठकबाईंची रिल जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी नुकतेच लग्नबंधनात अडकले आहेत. नुकताच त्यांचा शाही विवाहसोहळा पुण्यात पार पडला. अक्षया आणि हार्दिकवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेदरम्यान अक्षया आणि हार्दिकची मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अक्षया आणि हार्दिकचा लग्नसोहळा पुण्यात पार पडला आहे. वधू-वराच्या डोक्यावर अक्षता टाकण्यासाठी मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक मंडळींनी लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. बोहल्यावर चढण्यापूर्णी अक्षया आणि हार्दिकचं खास फोटोशूट पार पडलं. अक्षया आणि हार्दिकने लग्नसोहळ्यात मराठमोळा लूक केला होता. 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत राणादा आणि पाठकबाई आता खऱ्या आयुष्यात लग्नबंधनात अडकले आहेत.