1. सर्वात आधी पुण्यातील कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढत असल्याने काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे झाल्याचे पवार म्हणाले.



पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा दर 18 टक्क्यांवर गेल्याने काळजी घेणं अधिक गरजेचं झाल्याचं ते म्हणाले.



यावेळी पहिली ते आठवीचे वर्ग ऑनलाईनच सुरु राहणार असून नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं लसीकरण करण्यासाठी त्यांचे वर्ग सुरु राहतील असं पवार म्हणाले.



दरम्यान लसीकरणाची माहिती देताना पवार म्हणाले, पुण्यात 74 टक्के नागरिकांनी दोन्ही डोस घेतले असून कोरोनाला रोखण्यासाठी 100 टक्के लसीकरण करणं गरजेचं आहे.



त्यामुळे नागरिकांनी वेळेत आणि लवकर लसीकरण करुन घ्यावे.



मास्क नसल्यास 500 रुपये तर थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारणार असल्याचं ते म्हणाले.



तसंच मास्क सुरक्षित असणं अत्यंत महत्त्वाचं असून मास्क स्टायलिश, रंगीबेरंगी, कापडी किंवा सर्जिकल नसून तीन लेअर किंवा n95 अशा प्रकारचे असावे.



तसंच लॉकडाऊनबाबत बोलताना पवार म्हणाले, केंद्राने लवकर त्यांचे प्रोटोकॉल कळवावे म्हणजे निर्णय लवकर घेता येईल.



तसंच उद्या म्हणजे बुधवारी (5 जानेवारी) मुख्यमंत्र्यासोबत चर्चा करुन सर्व जिल्ह्यासाठी ऑर्डर काढणार असल्याचंही पवार म्हणाले.



कोरोनाचा पुन्हा वाढता धोका पाहता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतचं जनतेला संबोधन करताना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.