अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चननं (Aishwarya Rai Bachchan) काही दिवसांपूर्वी पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली होती.



ऐश्वर्यानं पेरिस फॅशन वीकमध्ये रॅम्प वॉक देखील केला होता.



ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.



ऐश्वर्याच्या फोटो आणि व्हिडीओला कमेंट करुन काही नेटकऱ्यांनी ऐश्वर्याच्या लूकला ट्रोल केलं आहे.



पॅरिस फॅशन वीकसाठी ऐश्वर्यानं गोल्डन कलरचा शिमरी गाउन आणि मोकळे केस असा लूक केला होता.



आता पॅरिस फॅशन वीकमधील ऐश्वर्याच्या व्हायरल झालेल्या फोटोला कमेंट करुन अनेकांनी ऐश्वर्याच्या लूकला ट्रोल केलं आहे.



एका नेटकऱ्यानं ऐश्वर्याच्या व्हायरल फोटोला कमेंट केली, 'ती खूप जाड दिसत आहे.'



तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'ती खरोखरच म्हातारी दिसते आणि तिचे वजन खूप वाढले आहे! ती पूर्वीसारखी सुंदर दिसत नाहीये'



पोन्नियिन सेलवन या चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली.



ऐश्वर्याच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.