अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या वडिलांची आठवण करून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक मेसेज लिहिला आहे.

ऐश्वर्याचा हा मेसेज खूपच भावूक करणारा आहे.

सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या या मेसेजची सध्या खूपच चर्चा होत आहे.

ऐश्वर्या रायचे वडील कृष्णराज राय यांना कर्करोग झाला होता.

या धोकादायक आजाराशी लढताना 2017 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

ऐश्वर्या त्यांच्या वाढदिवस किंवा पुण्यतिथीला फोटो पोस्ट करायला विसरत नाही.

अलीकडेच ऐश्वर्याच्या वडिलांची वाढदिवस झाला.

वाढदिवसानिमित्त ऐश्वर्याने एक फोटो शेअर करून त्याखाली खास मेसेज लिहिला आहे.

प्रिय प्रिय दादा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. भरपूर प्रेम. देव तुमचं भलं करो, असा मेसेज ऐश्वर्याने लिहिला आहे.

आता ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांतसोबत जेलर चित्रपटात दिसणार आहे.