लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीतील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविकांची गर्दी जमलेली असते. या दरम्यान हजारो भाविक साईंच्या चरणी दागिने, पैसे, अलंकार अशा अनेक गोष्टींचं दान करतात. नुकताच साई चरणी 42 लाख 80 हजार रुपये किंमतीचा सुवर्णमुकुट दान करण्यात आला आहे. एका दानशूर साईभक्ताकडून 648 ग्रॅम वजनाचा सुवर्णमुकुट दान करण्यात आला आहे. या मुकुटावर सुंदर, बारीक आणि आकर्षक अशी डिझाईन करण्यात आली आहे. साई मूर्तीला परिधान करण्यात आलेल्या या मुकुटाला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. दरम्यान या साईंच्या चरणी दान केलेल्या या देणगीदाराने आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती केली आहे.