बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर सध्या 'द नाइट मॅनेजर' या सिनेमामुळे चर्चेत आहे. आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'गुमराह' सिनेमातील आदित्य रॉय कपूरची भूमिका प्रेक्षकांना आश्चर्यचकित करणारी आहे. 'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूरसोबत बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरदेखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 'गुमराह'चा अंगावर शहारे आणणारा टीझर आऊट झाला आहे. आदित्य रॉय कपूरच्या 'गुमराह'ची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. आदित्य रॉय कपूरचा 'गुमराह' हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 'गुमराह' सिनेमात आदित्य दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. 'गुमराह' या सिनेमात आदित्य रॉय कपूर नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. आदित्य रॉय कपूरने या सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.