उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांची मुलगी अनन्या बिर्ला ही एक गायिका आहे. अनन्या बिर्ला ही गायिका, गीतकार आणि बिझनेसवुमन आहे. अनन्या तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो आणि गाण्याचे व्हिडीओ टाकत असते. अनन्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. अनन्याने 2016 मध्ये आपले डेब्यू साँग रिलिज केले. अनन्याने डेब्यू साँगमध्ये सीन किंग्स्टन, अफ्रोजॅक आणि मूड मेलोडीजसह प्रसिद्ध कलाकारांसोबत काम केले आहे. अनन्या बिर्लाला यंग बिझनेस पर्सनसाठी ET Panache Trendsetters of 2016 चा पुस्कार मिळाला आहे. अनन्याला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. वयाच्या 11 व्या वर्षी अनन्या संतूर वाजवायला शिकली. अनन्याने इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातूनही शिक्षण घेतले आहे.