आदिपुरुष' हा सिनेमा सुरुवातीला खूप रटाळ वाटतो.
प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात हा सिनेमा खूपच कमी पडला आहे.
पण हनुमानाच्या एन्ट्रीने प्रेक्षक सिनेमासोबत थोडासा जोडला जातो.
हनुमाना व्यतिरिक्त कोणतही पात्र प्रेक्षकांसोबत जोडलं जात नाही.
खराब वीएफएक्समुळे सिनेमा आणखी वाईट झाला आहे.
या सिनेमातील संवादेखील प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतात.
सिनेमातील लढाईची दृश्ये पाहताना झोम्बी लढत आहेत, असं वाटतं.
'आदिपुरुष'ला हॉलिवूड टच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
'आदिपुरुष' सिनेमातील फक्त सतत ऐकू येणारं श्रीरामाचं नाव ऐकण्यासारखं आहे.
रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान छाप पाडण्यात कमी पडला आहे.