ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित सिनेमा आहे.
'आदिपुरुष' या सिनेमात प्रभास, कृती सेनन आणि सैफ अली खानसारखे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
500 कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या सिनेमावर टीका का होत आहे हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक 'आदिपुरुष' पाहायला जात आहेत.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या 'आदिपुरुष' सिनेमातील व्हीएफएक्स पाहण्याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
नेपाळमध्ये 'आदिपुरुष'वर बंदी का घालण्यात आली हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात जात आहेत.
प्रभास आणि ओम राऊतचा मोठा चाहतावर्ग असून ते त्यांचा सिनेमा पाहायला पसंती दर्शवत आहेत.
सध्या बॉक्स ऑफिसवर 'आदिपुरुष'पेक्षा बहुचर्चित सिनेमा नसल्याने प्रेक्षक हा सिनेमा पाहायला जात आहेत.
'आदिपुरुष' सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.
सिनेप्रेमींनी 'आदिपुरुष' सिनेमाचं तिकीट रिलीजआधीच बूक केलं होतं.
'आदिपुरुष' सिनेमाची देशभरात चर्चा