टीव्हीच्या विश्वापासून बॉलिवूड असा प्रवास केलेली अभिनेत्री वाणी कपूर नुकतीच एका अवॉर्ड शोमध्ये आपल्या स्टाईलने सर्वांना घायाळ करताना दिसली होती.
यादरम्यान तिचा सुंदर लूक पाहून चाहत्यांची नजर तिच्यावरच खिळली होती.
या फोटोंमध्ये वाणी कपूर बार्बी डॉलसारखी दिसत आहे.
वाणी कपूरने एका अवॉर्ड नाईटसाठी हा लूक कॅरी केला होता, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चाहत्यांची मनं घायाळ करताना दिसत आहे.
वाणी कपूरच्या या सिंगल स्लीव्ह गाऊनमध्येही शिमरी पॅटर्न होता, जो तिच्या लूकला एक वेगळीच ग्रेस देत होता.
वाणी कपूरने ब्रेसलेट, कानातले, शिमरी मेकअप आणि मोकळ्या केसांसह तिचा लूक पूर्ण केला आणि कॅमेऱ्यासाठी सुंदर फोटो पोज दिल्या.
‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या वाणी कपूरने ‘बेफिक्रे’, ‘चंदीगड करे आशिकी’ आणि ‘बेल बॉटम’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
वाणी कपूरचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
यावर चाहते लाईक आणि कमेंट करताना दिसत आहेत.
वाणी कपूर तिच्या लूक, स्टाईल, ड्रेसिंग सेन्स आणि बोल्डनेससाठी ओळखली जाते.