अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी काही दिवसांपूर्वी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर पोस्ट करून त्यांच्या चाहत्यांना घटस्फोटाबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये त्यांनी वेगळं होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितले होते. समंथा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. तिनं नुकतीच एक फोटो शेअर केली आहे. या फोटोमध्ये समंथा तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसोबत पोज देताना दिसत आहे मंथानं शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री नयनतारा दिसत आहे. समंथानं फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिले, '22 फेब्रुवारी 2022 आमची 'स्पेशल' मैत्री. ती सोशल मीडियावर नाहिये. पण ती सर्वांवर प्रेम करते. '