अभिनेत्री पूजा सावंत ही मराठीतील सध्याची आघाडीची अभिनेत्री आहे. अंकुश चौधरी आणि पूजाची प्रमुख भूमिका असलेल्या 'दगडी चाळ-2' चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. 'क्षणभर विश्रांती' या सिनेमाच्या माध्यमातून पूजाने 2010 साली सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. पूजा सोशल मीडियावर तिचे क्लासी आणि ग्लॅमरस फोटो नेहमीच शेअर करत असते. पूजाने नुकतेच सोशल मीडियावर प्रिन्सेस ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहेत. प्रिन्सेस ड्रेसमधील पूजा ग्लॅमरस दिसत आहे. पूजाच्या या फोटो शूटमधील लूक घायाळ करणारा आहे. तिच्या नव्या फोटोवर चाहते फिदा झाले असून त्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पूजा सावंत वेस्टर्न आउटफिटसह ट्रॅडिशनल लूकमध्येही सुंदर दिसते. ट्रॅडिशनल लूकमधील तिच्या सौंदर्यावर चाहते भाळतात.