काही दिवसांपूर्वी 64 वा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लास वेगसमध्ये पार पडला या सोहळ्यात संगीत क्षेत्रातमधील अनेक कलाकारांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं भारतीय संगीतकार रिकी केज आणि फाल्गुनी शाह यांना देखील ग्रॅमी पुरस्कार पटकवला अभिनेत्री कंगना रनौतनं ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याचा निषेध करण्यास सांगितले ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नाही ऑस्करमध्येही लतादीदी आणि दिलीपकुमार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली नव्हती हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय असण्याचा दावा करतात पण दिग्गज लोकांना हे विसरतात असे तिने म्हटंल कंगना वेगवेगळ्या विषयांवरील तिची मत सोशल मीडियावर मांडते सध्या ती लॉक-अप या शोचे सूत्रसंचालन करते तिचा धाकड हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे