अभिनेत्री अमृता खानविलकर मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृता जितका सुंदर अभिनय करते. तितकीच सुंदर ती दिसतेसुद्धा. अमृताने मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट दिले आहेत. महाराष्ट्रात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. अमृता एक स्टायलिश अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अमृताने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पारंपरिक पेहरावाप्रमाणेच अमृता वेस्टर्न आउटफिट्स देखील शानदार पद्धतीने कॅरी करते. ब्यूटी विथ ब्रेन अशी थोडक्यात ओळख असलेल्या या अभिनेत्रीचा आज 37 वा वाढदिवस आहे. अमृता खानविलकर सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसह आपले एकापेक्षा एक सुंदर लुकमधील फोटो शेअर करत असते.